मुंबई आणि परिसरात पडणाऱ्या पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा आदेश

मुंबई: प्रतिनिधी

मुंबई व परिसरात  सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या.

कालपासून  जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे,आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.

मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्याचे निर्देश त्यांनी दिले.

About Editor

Check Also

गणेशोत्सवात साखर, बेसन, रवा अन् पामतेल सवलतीच्या दरात द्या मुंबई जनता दल (सेक्युलर) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘मुंबई जनता दल (सेक्युलर)’तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *