मुंबई

न्यायालयाचा सवाल, राऊत यांच्या बोलण्याची ईडीला अडचण नाही तर तुम्हाला का…? बोलण्यास अटकाव करणाऱ्या पोलिसांचे कोर्टाने उपटले कान

पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्याऐवजी राऊत यांना २ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच त्यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला. मात्र आज सुनावणीवेळी न्यायालयाच्या आवारात प्रसार माध्यमांशी राऊत यांच्या बोलण्याचा मुद्दा …

Read More »

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अडथळा ठरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत भाजपा आ. भातखळकरांची मागणी

मुंबई शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी उच्छाद आणला आहे. सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या कुत्र्यांबाबत कारवाई करण्यात अडथळा आणणाऱ्याांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश नुकतेच प्रशासन यंत्रणेला दिले आहेत. या निर्देशाची तत्काळ अंमलबजावणी करून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम तीव्र करावी, अशी …

Read More »

मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएच्या पत्राला बिल्डरकडून वाटाण्याच्या अक्षता

मागील सहा वर्षाहून अधिक काळ राज्याचे नगरविकास मंत्री आणि सद्यस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून जाहिर कार्यक्रमातून सांगत असतात. मात्र त्यांच्याच कार्यकाळात प्रकल्प बाधित नागरीकांना इमारत बांधून त्यांचे पुर्नवसन केले. परंतु त्या प्रकल्प बाधित नागरिकांना विकासकाने गळकी इमारत बांधून दिल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेकडे तक्रारीही …

Read More »

‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मागील २४ तासापेक्षा जास्त काळ सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारीतून वाहण्याबरोबरच पुण्याच्या रस्त्यावर आणि घराघरात पाणी शिरले. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे झाले. तर अनेक नागरीकांची वाहने पावसाच्या पाण्यात वाहून जाताना दिसत होते. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसत होते. या …

Read More »

अंधेरी पोटनिवडणूकः भाजपाच्या उमेदवारासह ७ जणांचे अर्ज मागे, ७ अद्यापही रिंगणात

अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणूकीत आज भाजपाने जाहिर केल्याप्रमाणे ऋतुजा लटके यांच्या विरोधातील भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांच्यासह इतर ७ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्यासह ७ जणांमध्ये आता निवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता …

Read More »

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार

पोलिसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. ४० वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेन्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलिसांच्या संपूर्ण …

Read More »

दिपक केसरकर यांची ग्वाही, मुंबईतील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबविणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले. फोर सेशन हॉटेल, वरळी येथे …

Read More »

अंधेरीत ३ नोव्हेंबरला आयोगाकडून सार्वजनिक सुट्टी विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ – अंधेरी पूर्व ‘ विधानसभा’ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुट्टी ‘१६६ …

Read More »

अंधेरी निवडणुक: उध्दव सेनेकडून ऋतुजा लटके तर भाजपाकडून पटेल यांचा अर्ज दाखल उध्दव सेना आणि भाजपाकडून शक्तीप्रदर्शन

राजीनामा स्विकारण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटके लगावल्यानंतर अखेर आज सकाळी मुंबी महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सकाळी ऋतुजा लटके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत गुंदवली येथील शाळेत अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने अर्ज भरला. तर भाजपाने माजी अपात्र नगरसेवक मुरजी पटेल …

Read More »

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस

दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर …

Read More »