परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील निलंबित दोन पोलीस पुन्हा सेवेत

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटाच लावलेला आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह खंडणी प्रकरणात निलंबित दोन पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सेवेत सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे.अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत अधिकाऱ्यां विरोधातील अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये दहा महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात घेण्याबाबतचा निर्णय झाला. व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह, गोपाळे आणि कोरके यांच्यासह अन्य पाच अधिकारी, संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती.

परमबीर सिंह यांचेसह डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अग्रवाल यांनी केला. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप यांच्यावर आहे.

ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच

परमबीर सिंह खंडणी प्रकरणात गोपाळे आणि कोरके यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांचे निलंबित करण्यात आले होते. मात्र, शिंदे – फडणवीस सरकार येताच नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचे निर्णय बदल करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. आता महाविकास आघाडीच्या काय प्रतिक्रिया येतात ते पहावे लागेल.

परमबीर हे मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप होता. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी परमबीर यांनी दिली होती. या प्रकरणात नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी ५० लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी कोरके व गोपाळे दोघांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलवले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

About Editor

Check Also

मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *