चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करत ऊर्फी जावेदने घेतली चाकणकरांची भेट पोलिस ठाण्यातही केली तक्रार दाखल

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आघाडी उघडली होती. तसेच ऊर्फी जावेदच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु या दोन्ही यंत्रणांकडून कोणतीच कारवाई न केल्याने चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद विरोधात सातत्याने टीका टीपण्णी कऱण्यास सुरुवात केली. या टीका टीपण्णी विरोधात अखेर ऊर्फी जावेद हीने तक्रार दाखल करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट घेतली आणि लिखित तक्रार दाखल केली.

ऊर्फी जावेद हिने चित्रा वाघ यांच्या विरोधात भारतीय दंडविधान संहिता अर्थात आयपीसी १५३ (ए) (बी), दाखल केलेल्या ५०४, ५०६, ५०६ (ii) खाली तक्रार दाखल केली. तसेच ऊर्फी जावेद हीच्या विरोधात गुन्हे वृत्तीने सातत्याने सामाजिक प्रतिमा मलिन करणे, सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. याशिवाय १४९ आणि १०७ क्रिमिनल प्रोसिजर अंतर्गत चॅप्टर केसही दाखल करण्यात आल्याची माहिती अॅड.नितीन सातपुते यांनी दिली.

तसेच याबाबतचा लिखित तक्रारीचा ई-मेल राज्य महिला आयोगाला पाठवून दिला असून दुपारी ऊर्फी जावेद हीने अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट घेतली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवाना भेट

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *