पैलवान महेश घुले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ७२ वजनी गटातील कुस्ती स्पर्धेसाठी झाली निवड

अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामगार कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी केंद्र व राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता राज्य – राष्ट्रीय पातळीवर विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अखिल भारतीय नागरीसेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन मंडी  हिमाचल प्रदेश येथे २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.

या स्पर्धेत विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवड चाचणी चे आयोजन सचिवालय जिमखाना मानद सचिव संजय पोफळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे करण्यात आले, यामध्ये ७२  किलो वजन गटात प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेले महेश घुले यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिवहन विभागाचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार,अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, सह परिवहन आयुक्त संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, श्रीमती अश्विनी स्वामी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड, पवन नव्हाडे,आनंद मेश्राम, प्रवीण आव्हाड, महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल बुचडे, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पांडुरंग पाटील, कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About Editor

Check Also

Mantralay

मंत्रालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई व नमुने तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती

मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई करण्यात येते. यापूर्वी २६ एप्रिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *