बंडखोर संजय शिरसाट यांची सारवासारव, मोबाईलची तांत्रिक चुक उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आधी पोस्ट नंतर डिलीट

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ४० आमदारांनी उठाव केला. यापैकी एक असलेले औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्राचे आमदार संजय शिरसाट यांनी काल रात्री अचानक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख करत त्यांचा विधानसभेतील भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटद्वारे शेअर केला. त्यामुळे शिरसाट हे मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच ते पुन्हा स्वगृही परतण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्या व्हिडिओचे योग्य ते राजकिय पडसाद उमटल्यानंतर शिरसाट यांनी तो व्हिडिओ ट्विटर प्रोफाईलवरून डिलीट केला.

त्या ट्विटसंदर्भात आमदार संजय शिरसाट यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही आजही शिवसेनेत आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आम्ही उध्दव ठाकरे यांना नेहमीच कुटुंबप्रमुख मानत आलो आहोत. आज जरी आमचे भांडण जरी झालं असलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. आम्ही दूर जरी झालो असलो तरी ते आमचे कुटुंबप्रमुख होतेच. त्यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती. आमची भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधात नसून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होती. विचार पटत नव्हते म्हणून आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ नातं तोडलेलं नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर आणि ते त्यांच्या भूमिकेवर तटस्थ राहिले असल्याचे स्पष्ट केले.

मंत्रिपद मिळावे म्हणून मी हे ट्वीट केलेलं नाही. मंत्रिपदासाठी मी भुकेलेलो नाही. मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये मी प्रत्येक वेळेला माझं स्पष्ट मत मांडलं आहे. मला योग्य वाटतं ते मी बोलतो आणि बोलताना मी त्यांनी आपला विचार थोडा बदलावा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊ नये, हीच भूमिका मी पहिल्यापासून मांडत आलो आहे. आजही मी त्या भूमिकेपासून मागे फिरणार नाही, मला मंत्रिपद मिळालं, नाही मिळालं हा विचार माझ्या डोक्यात कधी येत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

पण राजकारणा मलाही पुढे जावेसे वाटतेय. ३८ वर्षे राजकारणात आहे. मलाही वाटतं मंत्री व्हावं आणि लोकांची कामे करावेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात माझे नावं होते. मात्र नंतर ते काढलं गेले. मात्र मी परत जाणार नाही. मला दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल अशी आशा व्यक्त करत आपण मंत्रीपदाची आस सोडलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच तो व्हिडिओ माझ्या मोबाईलवरून शेअर झाला ती मोबाईलची तांत्रिक चुक म्हणा किंवा माझी म्हणा पण चुक झालीय अशी सूचक कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

संजय शिरसाठ यांचे हेच ते डिलीट केलेले ट्विट

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोठ्य़ा आकाराची घरे मिळणार

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *