शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल मतदारांना पैसे आणि दारू वाटप केल्याप्रकरणी कोपरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

शिवसेना उबाठा गटाचे कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे यांच्यासह उबाठा सेनेच्या ७ जणांवर ठाण्यातील कोपरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे आणि दारू वाटप करताना पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात काल रात्री २ वाजता कोपरी पोलिसांना एक गाडी संशयास्पदरित्या आढळली. या गाडीची तपासणी केली असता पोलिसांना विविध प्रकारच्या परदेशी मद्याच्या ६ बाटल्या आणि २ हजार रुपयांची २६ पाकिटात ठेवलेले ५२ हजार रुपयांची रक्कम आढळली. सदर रक्कम ही मतदारांना प्रभावित करण्यासाठी आणल्याने कोपरी पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेऊन त्यात बसलेले कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी केदार दिघे, सचिन गोरीवाले, प्रदीप शेंडगे, रवींद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनिता प्रभू, पांडुरंग दळवी, यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आली असून सहा बाटल्या मद्य आणि एकूण ५२ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

केदार दिघे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआरची प्रत

About Editor

Check Also

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगामाचे सन २०२६-२७ बाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *