कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची “त्या” घटनेबाबत केला खुलासा मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ प्रकरण

काल रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केली असल्याचे चर्चा सुरू असताना त्यावर आता अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मी कोणत्याही स्वरुपाची शिवीगाळ केली नसल्याचा खुलासा केला.

अब्दुल सत्तार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी, शिंदे गटाची बैठक झाली. सदर बैठकीत १०० दिवसातील राज्य सरकारची कामगिरी आणि निवडणूक आयोगाचा निकाल यावर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच त्यांच्या स्वीय सचिवाला शिवीगाळ केली. अशा प्रकारचे वृत्त माध्यमातून प्रसारीत झाले होते. यावर कालच्या बैठकीत मी कोणत्याही स्वरुपाची शिवीगाळ केली नाही. गेली ४० वर्ष मी राजकारणात आहेत. अशा पद्धतीने मी वागेल का, असा उलट प्रश्न करीत सदरची बातमी धांदात खोटी असल्याचे स्पष्ट केले.

या बैठकीत आपल्या मतदार संघातील कामांबाबत चर्चा करत होतो. काही कामांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे पूर्वीच्या कामाला स्थगिती द्या. मात्र आताच्या कामाला स्थगिती देऊ नका असं मत व्यक्त केले असे सत्तार यांनी सांगितले. बैठक सोडून आपण निघून गेलात यावर विचारता बैठकीतून फक्त मीच नव्हे तर इतरही काही मंत्री निघून गेले. एका रुग्णाला पाहण्यासाठी जायचे असल्याने आपण तेथून निघालो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे पक्ष चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविल्यानंतर शिंदे गटाच्या खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक वर्षा बंगल्यावर होती. सदर बैठकीत कामाचा आढावा घेण्यात येत होता. त्याचवेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांवर भडकले आणि त्यांनी शिवीगाळ केली. या प्रकारामुळे शिंदे गटाच्या उपस्थित नेत्यांना धक्का बसला. यामध्ये काही मंत्री आणि आमदारांनी मध्यस्थी करीत प्रकार मिटविता घेतला. शिवीगाळ प्रकरणानंतर सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडत निघून गेल्याचे वृत्तही प्रसारीत झाले होते. यावर सावरासावर करण्याचा सत्तार यांचा प्रयत्न असल्याची चर्चा मंत्रालय परीसरात आहे.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश, ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारणीस गती द्या; गुणवत्तेत तडजोड नको डॉ बाबासाहेब बेडकर यांचा ७५ फुटाचा पुतळा उभारणार

लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ (Statue of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *