ठाकरे गटाला मिळाले हे नाव आणि चिन्ह मात्र शिंदे गटाला नाव मिळाले चिन्ह नाही त्रिशुळ आणि गदा ही चिन्हे मात्र बाद

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अर्ज करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिंदे गटाकडून उगवता सुर्य, त्रिशुळ आणि गदा ही तीन चिन्हे पाठविण्यात आली. तर उध्दव ठाकरे यांनी यापूर्वीच त्रिशुळ, उगवता सुर्य, धगधगती मशाल ही चिन्हे पाठविली होती. या तीन चिन्हा पैकी त्रिशुळ आणि गदा ही चिन्हे धार्मिक चिन्हाशी निगडीत असल्याने ती बाद करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही गटाला नेमकी कोणती चिन्हे मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. ती अखेर संध्याकाळी निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचे नाव दोन्ही गटांना जारी केले.

संध्याकाळी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार उध्दव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे तात्पुरते चिन्ह जारी करण्यात आले. त्याचबरोबर पक्षाचे नाव म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हे नावं देण्यात आले आहे.
तर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे मागणी केलेल्या नावापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे मिळाले आहे. तर चिन्हाबाबत ठाकरे गटाने मागणी केलेल्या चिन्हापैकी दोन चिन्हे सारखीच होती. त्यामुळे नव्याने चिन्ह सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले.

दरम्यान, शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावे पाठवित यापैकी एक नाव देण्याची मागणी केली होती. यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आयोगाने अंतिम करण्यात आले आहे.

१९८९ साली शिवसेनेला धनुष्य बाण हे चिन्ह मिळाले होते. त्यानंतर शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे चिन्ह गोठविले गेले. त्यानंतर पहिल्यांदा शिवसेनेला आपले चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हावर अंधेरीची विधानसभा पोटनिवडणूक लढवावी लागत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत जारी करण्यात आलेले आयोगाचे आदेश

उध्दव ठाकरे यांच्या गटाबाबत जारी करण्यात आलेले आयोगाचे आदेश 

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *