आकाश फुंडकर यांचे निर्देश, संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्या टेक्नो क्राफ्ट इंडस्ट्रीजच्या गारमेंट विभागातील संपाबाबत सूचना

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर बोलत होते.

बैठकीस मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उप कामगार आयुक्त संभाजी वन्हाळकर अप्पर कामगार आयुक्त भगवान आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर,  कंपनीचे संचालक सुदर्शन सराफ आदी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचारी मागील १  डिसेंबर २०२५ पासून संपावर  आहे. याबाबत तोडगा काढणे आवश्यक आहे.  संप करण्यामागे कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या  मागण्या लक्षात घेता मागण्या पूर्ण करण्यासाठी मानवीयदृष्टीने कार्यवाही करण्याची गरज आहे.  अशा परिस्थितीत कामगार व कंपनी हिताचा सुवर्णमध्य साधत कंपनी संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावेत.  कायम व कंत्राटी कामगारांच्या अडचणी समजून घेत,  त्यांना यशस्वीपणे सोडविण्यात यावे.

आकाश फुंडकर म्हणाले की,निलंबित केलेल्या कामगारांना सेवेत घेतल्यानंतर कामगारांनी संप मागे घ्यावा. याबाबत करण्यात येणारे आंदोलनही स्थगित करावे, असे आवाहनही यावेळी यावेळी केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन सह्याद्री गुजरातच्या उद्योगपतीला विकण्याचे पाप टोरंट प्रकल्पाच्या बचावाचे सरकारचे सर्व दावे खोटे, हजारो रोजगार व लाखो वृक्ष लावण्याची घोषणा पोकळ, ३३ कोटी झाडांचे काय झाले?

छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन वारसा असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील समृद्ध वनसंपदेवर भाजपा महायुती सरकारने कुऱ्हाड चालवली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *