Tag Archives: labour minister

आकाश फुंडकर यांची माहिती, श्रम शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमध्ये सामंजस्य करार, उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्याधारित अभ्यासक्रमांना चालना

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला या करारामुळे नवी गती मिळेल, असा विश्वास कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कामगार कायद्यांमधील सुधारित बदलांनुसार व्यापक ‘कामगार हिताला’ प्राधान्य द्यावे विविध कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांचे सादरीकरण

कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक ‘कामगार हित’ जपण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत दिले. केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. …

Read More »

आकाश फुंडकर यांची माहिती, स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आस्थापनेत माथाडी कामगारांना काम

राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात दापिवली (ता पनवेल जि. रायगड) येथील मे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या आस्थापनेत स्थानिक माथाडी कामगारांना माथाडी स्वरूपाचे काम मिळण्याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. …

Read More »

आकाश फुंडकर यांचे निर्देश, संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्या टेक्नो क्राफ्ट इंडस्ट्रीजच्या गारमेंट विभागातील संपाबाबत सूचना

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात …

Read More »

आकाश फुंडकर यांची माहिती, गिग कामगारांसाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन होणार विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दरम्यान दिली माहिती

गिग कामगारांसाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना नव्हती. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहिता २०२० पारित करून त्याची अंमलबजावणी २१ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू केली आहे. या संहितेत प्रथमच गिग आणि प्लॅटफॉर्म वर्करची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. या कायद्यानुसार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन होणार आहे, असे कामगार मंत्री आकाश …

Read More »

आकाश फुंडकर यांचे आदेश, नवीन कामगार संहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे विभागातील अधिकाऱ्यांना आदेश

केंद्र शासनाने चार नवीन कामगार संहिता देशभरात लागू केल्या आहेत. या संहितांच्या तरतुदींची राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिल्या आहेत. ना. मे. लोखंडे श्रम विज्ञान संस्था, नागपूर येथे नवीन कामगार सहितांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आढावा घेतला. बैठकीस कामगार …

Read More »

गिग कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची माहिती

महाराष्ट्रातील गिग (Gig) कामगारांना शासनाच्या विविध योजना, कल्याणकारी योजना, सेवा सुविधा आणि सामाजिक सुरक्षासंहितेचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच अन्य संघटित कामगारांना मिळणाऱ्या आरोग्य विमा, अपघात विमा, पेन्शन योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच आपत्कालीन आर्थिक मदत यांसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून या गिग कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड आकाश …

Read More »

राज्य सरकार आणि कामगार बोर्डाची मान्यता न घेताच दिले कंत्राटदाराला कोट्यावधी रूपये नाव बांधकाम कामगारांचे आणि साडेतेरा कोटी रूपये खाजगी कंपनीचे

मराठी ई-बातम्या टीम कोविड काळात राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत सहाय्य निधी वाटपाचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. परंतु या पैसे वाटपासाठी राज्य सरकार आणि कामगार कल्याण मंडळाची मान्यता न घेताच बांधकाम आणि इतर कामगार विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी (MBOCWW) आणि मंत्रालयातील एका उपसचिवाने परस्पर एका खाजगी कंपनीची नियुक्ती करत बांधकाम कामगारांना पैसे …

Read More »