आदित्य ठाकरे यांचा इशारा, महाराष्ट्र स्वाभिमानी ! तो तुम्ही विकत घेऊ शकत नाही

शिर्डीतील शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेला आज शिवसेना नेते आमदार आमदार आदित्य ठाकरे यांच्या आज सभा झाली. यासभेला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार शंकरराव गडाख, सुनील शिंदे, लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष संदीप वरपे उपस्थित होते. या भव्य प्रचार सभेनंतर अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुका प्रशासकीय कार्यालय येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी उपस्थित गर्दी पाहून शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री झाल्याचं सांगत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान टिकवायचं असेल, महिलांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवाचे असतील तर मशालला मतदान कराव लागेल असं आवाहन मतदारांना केलं.

अहमदनगर येथील आयोजित सभेत संबोधित करताना मोदी सरकारच्या फसवणुकीच्या धोरणावर सडकून टीका केली . यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘आपल सरकार आल तेव्हा आपण कर्जमाफी ‌केली, ही आहे ठाकरे गॅरंटी. मविआ सरकारने नुकसान भरपाई दिली’. मात्र मोदी सरकारने शेतक-यांवर ड्रोन द्वारे अश्रुधूराचा वापर केला. देशात नोक-याच निर्माण होत नाही ? राज्यात अडीच वर्षात एक तरी उद्योग आला का ? सगळे उद्योग गुजरातला नेले. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे. कदाचित काही दिवसात ४०० पार होईल. गॅसच, डिझेल किती किमतीवर पोहचलय ? गरीब देखील खुष नाही. गुजरातला क्रिकेटची फायनल का नेली ? पुत्र प्रेमाचे आरोप आमच्यावर करता. असं म्हणत ‘महाराष्ट्र स्वाभिमानी ! तो तुम्ही विकत घेऊ शकत नाही’ असा इशाराही यावेळी भाजपाला दिला .

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *