नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. तरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे, त्यामुळे भाजपाचा दारुण पराभव होणार हे अटळ आहे, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला आहे, जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवले. नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तरुणांना फसवले, शेतमालाला दीडपट भाव देणार, उत्पन्न दुप्पट करणार असे सांगून शेतकऱ्यांना फसवले, कामगारांना देशोधडीला लावले, महिलांना फसवले, त्यामुळे जनतेत मोदी सरकारविरोधात तीव्र संताप आहे. हा संताप प्रचारावेळी दिसून आला. देश विकून देश चालवला त्याला विकास म्हणणार का? गब्बरसिंग टॅक्स आणून जनतेला लुटले व मुठभर धनदांडग्यांचे खिशे भरले याला विकास म्हणतात का? असे सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, विदर्भाची जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलेली आहे, यावेळीही जनतेचे मोठे समर्थन मिळाल्याचे दिसले, त्यामुळे नागपूर, रामटेक, गडचिरोली -चिमूर, चंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया या पाचही मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा विश्वासहीही यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची मागणी, कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करा आणि नुकसान भरपाई द्या प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्या, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *