शिवसेनेतील बंडखोरीवरून शरद पवार यांच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही

शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. यावरून काल पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पुरविण्यात आलेल्या सुविधा आणि दिलेल्या आर्थिक पाठबऴावरून भाजपावर निशाणा साधला. तसेच राष्ट्रीय पक्षांच्या नावांची यादी वाचून दाखवित सहा राष्ट्रीय पक्षांपैकी कोणत्या राजकिय पक्षाकडे राजकिय ताकद आहे हे सांगायला वेगळं नको असे सूचक विधान करत सूरत आणि आसाममध्ये भाजपाचे राज्य सरकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना नेमके कोण पाठबळ देतेय हे ही स्पष्ट होत असल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधल्यानंतर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सारवासारव करत शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केला.

भाजपाकडे कोणीही सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यांनी सांगितले की, भाजपाच्या निर्णय प्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेते असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या दोन तृतियांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे, त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच ते शरद पवार यांनाही आहे. त्यानुसार ते मत व्यक्त करत असतात असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही. तथापि, अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, असे आपण यापूर्वी सातत्याने म्हणत होतो, याची आठवणही त्यांनी पत्रकारांना करून दिली.

About Editor

Check Also

प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणा करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *