राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश जारीः इतक्या जागांसाठी निवडणूक नाही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

मराठी ई-बातम्या टीम
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबर २०२१ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील ४ रिक्तपदांच्या आणि ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींतील ७ हजार १३० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबर २०२१ च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हापरिषदेतील २३ जागांवर, या दोन जिल्ह्यातील ४५ जागा राज्यातील ३४४ नगर पंचायतींच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया आता स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केले.
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुणावनीपर्यंत ही स्थगिती दिली असून ही पुढील सुणावनी १३ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमधील ओबीसी जागांवर असलेली स्थगिती कायम राहणार की ती उठविणार याचे उत्तर लवकरच मिळेल.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा
• भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- २३ (एकूण जागा १०५)
• भंडारा व गोंदियातील १५ पंचायत समित्या- ४५ (एकूण जागा २१०)
• राज्यातील १०६ नगरपंचायती- ३४४ (एकूण जागा १,८०२)
• महानगरपालिका पोटनिवडणुका- १ (एकूण ४ जागा)

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *