बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गंभीर दखल पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश

बदलापूर येथील लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.भविष्यात लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांना दिले.

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व शिक्षण समिती सभापती प्रियंका आशिष दामले यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि त्याबाबत निवेदन सादर केले.

अजित पवार पुढे म्हणाले की, बदलापूरमध्ये पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुकलीवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक, धक्कादायक आहे.लहान मुलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पूर्व प्राथमिक शाळा, मुलांसाठीची वाहतूक व्यवस्था आणि शाळा व्यवस्थापनासाठी कडक व स्पष्ट प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करावी व त्या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करावा असे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांना देण्यात आले आहेत.

नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दोषींना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही. लहान मुलांची सुरक्षितता,पालकांचा विश्वास आणि शाळांमधील सुरक्षित वातावरण राखणं ह्या बाबी अनिवार्य आहेत. बदलापूर येथील प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, आरोपीला कठोरात कठोर कायदेशीर शिक्षा दिली जाईल असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी  महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर आज प्रदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *