जे नको ते नाकरणाऱ्या मतदारांचे अभिनंदन भाजपच्या पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातील भाजप शासित राज्यातील सत्ता मतदारांनी उलथवून टाकली. त्यामुळे भाजप आता नको अशी भावना स्थानिकांमध्ये झाल्यानेच जे नको ते नाकारणाऱ्या मतदारांचे जाहीर आभार मानत असल्याची उपरोधिक टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.

निवडणुकीत हार-जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन होतच असते. पण चार राज्यांत परिवर्तन घडवणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करत असून ‘ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी त्याहीपेक्षा पर्याय कोण ? या फालतू प्रश्नात गुंतून न पडता मतदारांनी जे नकोत त्यांना आधी नाकारले आणि उखडून फेकल्याचे त्यांनी सांगितले.

पुढचे पुढे काय ते बघू. हेच खरे धाडस आहे. मतदारांच्या धाडसाने दाखवलेली ही दिशा असून या सर्व मतदारांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ९ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत पुण्यात होणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *