भाजप सरकार डिझास्टर मॅनेजमेंट नाही तर डिझास्टर टुरिझम करतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
भाजप सरकार डिझास्टर मॅनेजमेंट नाही तर डिझास्टर टुरिझम करत आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते सैरसफाटा मारायला आणि सेल्फी काढण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे भाजप सरकार असंवेदनशील आहे. वेळेवर निर्णय घेत नाही. लोकं आज अडचणीत आहेत आणि हे प्रचार कसा होईल याकडे यांचे लक्ष आहे.
सरकारचा हा भोंगळ कारभार राज्यातील जनता पहात असून ही जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांना मारहाण करून लघवी पाजण्याचा विकृत प्रकार, गुन्हेगारांना मोक्का लावा; गोरक्षणाच्या नावाखाली चाललेला नंगानाच थांबवा.

महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *