धनंजय मुंडे यांची माहिती, मला बेल पल्सी आजाराचे निदान वाढत्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी दिली माहिती

मागील काही महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या कथित संबधावरून आणि कृषी खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरूनही गदारोळ उठलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे रूग्णालयात दाखल झाले असून बेल पल्सी आजाराचे निदान झाल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

धनंजय मुंडे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये, माझ्या (धनंजय मुंडे) दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता असे स्पष्ट केले.

धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही असेही यावेळी सांगितले.

शेवटी धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकान्वये म्हणाले की, याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईन… अशी ग्वाहीही यावेळी दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’साठी कंपनीची स्थापना करणार जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *