अजित पवार म्हणाले, “आपण कोंबडी, कुत्रे आणि मांजराचे प्रतिनिधित्व करत नाही” आमदारांच्या गैरवर्तनावरून आमदारांना झापले

मराठी ई-बातम्या टीम

आपण राज्यातील लाखो मतदारांची प्रतिनिधित्व या सभागृहात आमदार म्हणून करीत असतो आपण कोंबडी, कुत्रे किंवा मांजर यांचे प्रतिनिधित्व येथे करत नाही. त्यामुळे प्राण्यांचे आवाज काढून आपले गैरवर्तन दाखवू नका असे खडे बोल उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभेतील आमदारांना सुणावत सर्व आमदारांनी आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करावा आणि सभागृहात सभागृहाच्या प्रांगणात शिष्टाचार आणि सभ्यतेला धरून वर्तन करावे असे आवाहन केले.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आमदारांच्या सभ्य वर्तनाबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना त्यांनी आमदारांना खडे बोल सुणावले.

ज्यावेळी आम्ही निवडून आलो.‌ त्याकाळात विधीमंडळाचे कामकाज लाईव्ह होत नव्हते. परंतु आता दोन्ही सभागृहाचे कामकाज लाईव्ह होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पहात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संसदीय शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे. आमदारांना दोन – दोन लाख मतदार मतदान करुन विधानसभेत पाठवत असतात. त्यांचे प्रतिनिधीत्व आमदाराला करायला हवे‌ असेही ते यावेळी म्हणाले.

आमदारानी आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख व्हावे आणि सभ्याचार, शिष्टाचार, आदर्श आचारसंहितेचे पालन करून राज्यासमोर आदर्श ठेवावा ,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्याच्या विधानसभेचे नेहमीच नैतिक मधले जपण्याचा प्रयत्न केला आहे राज्यासमोर  शिष्टाचार आणि आदर्श आचारसंहितेचे पालन नेहमीच करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कितीकदा काही सदस्यांकडून गैरवर्तन होऊन सभागृहाच्या प्रतिमेला तडा जातो ही अत्यंत दुर्दैवी बाब असून यापुढे सभागृहाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही असे वर्तन सर्व सदस्यांनी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार नितेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या सभागृहातील वर्तनानंतर अशा पद्धतीचे वर्तन करू नये यासाठी अध्यक्ष गटनेते प्रतनिधी व उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची आज एक बैठक झाली. या बैठकीनंतर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची पुस्तिका सर्वांना देऊन त्याप्रमाणे वर्तन अपेक्षित आहे असे सभागृहात सांगण्यात आले.

सभागृहात चुकणाऱ्या सदस्यांना योग्य शिक्षा करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. त्यानुसार अध्यक्षांनी सदस्यांना छोटी-मोठी शिक्षा करायला हवी, मात्र त्यासाठी कुणालाही बारा बारा महिन्यांची शिक्षा करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त करत एकप्रकारे भाजपाच्या त्या १२ आमदारांचे निलंबित रद्द करण्याबाबतची सूचना त्यांनी अध्यक्षांना केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी केलेल्या निवेदनाचे समर्थन करत सभागृहाचा दर्जा कायम ठेवावा असे सांगत सदस्यांना देण्यात आलेल्या पुस्तिकेमध्ये आणखी काही वर्तनाचे नियम जोडून नव्याने सदस्यांना पुस्तिका देण्यात याव्यात जेणेकरून सभागृहाबाहेर ही कसे वर्तन करावे याचे त्यांना आकलन होईल अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

About Editor

Check Also

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा २७ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल रद्द करण्याची मागणी

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *