अजित पवार यांचा टोला, सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपी पैशाने मस्तपैकी… केंद्रात, राज्यात सत्ता आहे मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय? मुहुर्त बघताय का?...

अहो जाहिरातीवर आता ५५ कोटी नाही तर पार १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे कारण सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत… लोकांसमोर कसे जायचे… जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे – सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग करावे लागते आहे. अशापध्दतीने लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरू आहे असा थेट हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवार यांनी समर्पक उत्तरे दिली.

यावेळी अजित पवार म्हणाले, सरकारने जर वेगवेगळ्या योजना आणि त्या योजनेबद्दल जाहिरात करून लोकांना जागृत केले असते तर समजू शकतो. आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळी अशी जाहिरातबाजी केली नाही. आम्ही निवडून आलो त्यावेळीही जाहिराती केल्या नाहीत असा खोचक टोलाही लगावला.

यावेळी भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आज केंद्र व राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्या अनिल बोंडेना सांगा तपास करा.. ‘दूध का दूध पानी का पानी’ येऊ द्या लोकांसमोर… वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नावे घेण्यापेक्षा पोलिसांनी दंगल कुणी घडवली ते शोधून काढावे… यामागे कोण सूत्रधार आहे ते समोर येऊ दे आणि जो कुणी दोषी असेल त्याला कडक शासन केले पाहिजे. अजिबात कुणाचा मुलाहिजा बाळगू नका पण त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका असे आवाहनही केले.

शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले ती मदत मिळाली नाही. पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आणि नियमित परतफेड करणार्‍या तमाम शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळायला हवे होते ते काही प्रमाणात काहींना मिळाले आहेत. पुरवणी मागण्यांमध्ये आणि बजेटमध्ये ही रक्कम घेतली आहे. त्यातून मंजूर करून देतील. त्यामुळे अंमलबजावणीसाठी थोडा वेळ सरकारला द्यावा लागेल. थोडी वाट बघू आणि नाही झाले तर मग आम्ही आमची भूमिका मांडू असा इशाराही अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिला.

सावरकर यांच्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, केंद्रात, राज्यात सत्ता आहे, मग कुठल्या वेळेची वाट बघताय? मुहुर्त बघताय का? सावरकरांना भारतरत्न देण्याचा असा थेट सवाल अजित पवार यांनी उपस्थित करुन वेळ कशाची असते. अजूनही खूप मोठ्या व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत त्यांना भारतरत्न मिळायचा बाकी आहे. त्यात सावरकर आहेत असेही स्पष्ट केले. यावेळी गौरव यात्रेवरून बोलताना अजित पवार म्हणाले, गौरवयात्रा काढता मग कोश्यारी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व इतर महापुरुषांबद्दल भाजपाचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली. त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही? त्या महापुरुषांबद्दल का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत? हे निव्वळ राजकारण आहे अशा शब्दात शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले.

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे आदेश, पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा टँकर हा अंतिम पर्याय; जलस्रोत बळकटीकरण, नाला खोलीकरण, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण योजना तातडीने कार्यान्वित करा

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *