महाविकास आघाडीचं ठरलं, कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणाचा उमेदवार

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होवून जवळपास २० ते २५ दिवस झाले. पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच जागांवर निवडणूकीची प्रक्रियाही आता थोड्याच कालावधीत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मविआ अर्थात महाविकास आघाडीने गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढविणार याची माहिती संजय राऊत यांनी पक्षनिहाय लोकसभा मतदारसंघाची यादी वाचून दाखविली. यावेळी शिवसेना उबाठाकडून जळगांव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षण, मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य) या २१ जागा लढविणार आहे.

तर काँग्रेसकडून १७ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे. यात नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई अशा एकूण १७ जागी आपले उमेदवार उभे करणार आहे.

तर काँग्रेसच्या दोन जागांवर दावा केलेल्या सांगली आणि भिवंडी यांना दोन जागांवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वाद होता. पण अखेर सांगलीची जागा काँग्रेसने शिवसेना उबाठाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकरिता सोडली. तर भिवंडी येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला काँग्रेसने सोडली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती, शिरूर, दक्षिण अहमदनगर, माढा, भिवंडी, सातारा, बीड, वर्धा, रावेर, दिंडोरी या १० जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आल्या आहेत.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *