दुकानावरील पाट्यावर आणि शासकीय कामकाजात मराठी भाषा वापरा अन्यथा… मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी

उद्योग, उर्जा, विधी व न्याय आदी विभागांतील शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यातील त्रुटी तत्काळ दूर करा, असे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागांना दिले.

देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालायत संबंधित विभागाची बैठक घेण्यात आली.

उद्योग विभागातंर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीसोबत मराठी भाषेत असलेच पाहिजे, कामगार विभागाने दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतून आहेत का? याची तपासणी करावी. विशेषतः दहा पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांवर व आस्थापनांवर मराठीत पाट्या नसतील तर त्यांना कारवाईतून मिळणारी सूट बंद करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उर्जा विभागातील महावितरणच्या तक्रार निवारण कक्षामध्ये मराठी भाषेतून कामकाज करण्याच्या सूचना केली.

दरम्यान, राज्यात कायदे तयार होताना त्याचा मूळ मसुदा इंग्रजीत तयार होतो तो मसुदा मुळातून मराठी भाषेत तयार करणे शक्य आहे का, याचीही तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय व लघु न्यायालयात मराठीचा वापर कोणत्या स्तरावर केला जातो, याची सांख्यिकी माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश विधी व न्याय विभागाला देण्यात आले आहेत. ज्यामुळे मराठीचा वापर वाढविण्याकरिता अडचणी असल्यास त्या दूर करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण • सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक• हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *