मंत्री शिंदे गटाचा मात्र शिकवणी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सभागृहातच रोहयो कामगारांच्या नावाने एक कोटींचा अपहार झाल्याप्रकरणी निलंबित केल्याची मंत्री संदीपान भुमरे यांची माहिती

उस्मानाबाद जिल्ह्यातील रोहयोच्या कामात १ कोटी १२ लाख रूपयांचा अपहार झाल्याचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान उपस्थित केला. त्यावर शिंदे गटाचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी उत्तर देताना अनेकदा विधिमंडळातील बोलण्यासंदर्भात शासकिय शिष्टाचाराचे पालन करत नव्हते. त्यामुळे अखेर ठाकरे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्री संदीपान भुमरे यांची चक्क शिकवणीच घेतल्याचे दिसून आली.

उस्मानाद जिल्ह्यातील पंचायत समितीने रोहयो अंतर्गत कामे सुरु केली. मात्र या कामावर घेण्यात आलेल्या कामगारांची खोटी जॉब कार्ड काढण्यात आली. तसेच या कामगारांची सर्व खाती बीड जिल्ह्यातील दाखवित एकच बँक खाते नंबर असल्याची बाब आमदार कैलास पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.

पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संदीपान भुमरे यांनी सुरुवातीला कितीचा अपहार झाला, कितीजणांना निलंबित केले याची सविस्तर माहिती देत नव्हते. त्यावेळी त्यांच्यापासून चार पावलावर बसलेले ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर हे त्या अनुषंगाने मंत्री भुमरे यांना विचारत होते. त्यामुळे भुमरे यांना सविस्तर उत्तर द्यावे लागत होते.

याशिवाय मंत्री भुमरे यांनी उत्तर देताना थेट आमदार कैलास पाटील यांचे नाव घेतले. त्यावेळी सभागृहात असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने मंत्री भुमरे यांना लगेच सूचना केली. सदस्याचे नाव घ्यायचे नसते, त्याऐवजी सन्मानिय सदस्य अशा शब्दाचा वापर करायचा अशी सूचना केली.

त्यानंतर पुन्हा मंत्री संदीपान भुमरे हे उत्तर देताना कैलास पाटील यांच्याकडे पहात उत्तर देऊ लागले. त्यावेळी पुन्हा एकदा अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील म्हणाले, मंत्री महोदय संबधित आमदारांकडे पाहुन उत्तर द्यायचे नसते. अध्यक्ष महोदयांकडे पाहून उत्तर द्यायचे असते. आणि सुरुवातीला अध्यक्ष महोदय असे म्हणायचे अशी सूचना केली.

त्यानंतर उत्तर देताना मंत्री भुमरे यांनी मग त्यानुसार उत्तर देताना दुरूस्ती करत आपले उत्तर पूर्ण केले.

यावेळी मंत्री भुमरे यांनी १ कोटी १२ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे मान्य केले. तसेच यापैकी ७६ लाख रूपये वसूल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्या सर्वांची चौकशी सुरु असल्याचे स्पष्ट केले.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी मंत्री भुमरे यांची बोलण्याची शिकवणी घेतल्याचे चित्र सभागृहात पाह्यला मिळाले.

About Editor

Check Also

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम • १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे • दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *