आमदार विलास तरे यांचा विधानसभेत सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा केला भांडाफोड मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशी व कारवाईचे आदेश

वसई विरार शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर विधानसभेत तारांकित प्रश्न क्र. २४५६९  उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा भांडा फोड केला असून त्यावर मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई चे आदेश दिले आहेत.

यावेळी आमदार विलास तरे म्हणाले की, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थावर कारवाई झालेली आहे. ३० ठिकाणी धाडी पडलेल्या आणि ३० ठिकाणी कारवाई झालेली आहे. माझ्या मतदारसंघांमध्ये पेल्हार पोलीस स्टेशन अंतर्गत बाजूला हाकेच्या अंतरावर ११ कोटीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केलेला आहे. मी मंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने ही कारवाई झालेली होती. स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देऊन देखील  त्यावेळेस त्यांनी कारवाई केली नाही.  मी केली होती तेव्हा. तेव्हा साहेब तिथे कारवाई झाली नाही. परंतु, मंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुंबईच्या टीमने ती कारवाई केली. आणि ह्याच पोलीस स्टेशनच्या पेल्हार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आता सुद्धा माझ्याकडे सीडी आहे. २ ते ३ दिवसापासून तिथे अंमली पदार्थ खुल्या आमपणे विक्री केले जातात. पेल्हार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात मी मंत्र्यांना सीडी देणार आहे. ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे अंमली पदार्थ जिथे विक्री होते त्या पीआय वर आपण कारवाई करणार का? आणि पेल्हार पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे जे पानटपरी असतील किंवा छोटी किराणा दुकाने असतील इथे हप्ते घेऊन त्यांना प्राधान्य दिले जाते याची चौकशी करून कठोर कारवाई करणार का ? असे माझे विशिष्ट प्रश्न आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हणाले की, आमदार विलास तरे यांनी जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती खरी मानून त्यांनी पत्र दिल्यानंतर कारवाई झाली नसेल आणि मुंबई पोलिसांनी त्याच ठिकाणी कारवाई केली असेल तर याची चौकशी केली जाईल आणि याकरिता जो कोणी जबाबदार अधिकारी असेल तो कुठल्याही दर्ज्याचा  असो त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि त्यांनी जी आता सीडी च्या माध्यमातून माहिती दिलेली आहे त्या माहितीची चौकशी तात्काळ करण्याचे आदेश देण्यात येतील, असे सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *