नाना पटोले यांची घोषणा, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार,राष्ट्रीय मतदार दिनी आंदोलन लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपा व निवडणूक आयोगाचा निषेध करणार

भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणुक आयोगाच्या मदतीने घोटाळा केला. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे निवडणूक आयोग देत नाही. राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही अशी जनभावना निर्माण झाली असून मतदान मतपत्रिकेवरच घ्यावे अशी मागणी जनतेतूनच येत आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे, निवडणूका या निष्पक्ष, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पाडल्या पाहिजेत यासाठी काँग्रेस राष्ट्रीय मतदार दिनी दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.

उद्याच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नेते आमदार खासदार, माजी आमदार खासदार, जिल्हा पदाधिकारी, विभाग व सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रमुख नेत्यांची यादी सोबत जोडली:

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *