विजय सिंगच्या मृत्यूची मानवाधिकार आयोगामार्फत चौकशी करा आयोगात राष्ट्रवादी खटला लढविणार असल्याची प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
वडाळा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोगाची भेट घेऊन केली.
विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलिस अधिकारी आणि पोलिस कस्टडीमध्ये मारहाण करणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलिस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोग कार्यालयात जाऊन मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष एम. ए. सईद आणि अतिरिक्त सचिव व्ही. के. गौतम यांची भेट घेत निवेदन सादर केले.
यावेळी निवेदनात वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाण्यात विजय सिंग या तरुणाचा पोलिस कस्टडीमध्ये मारहाणीत मृत्यू झाला. मात्र मारहाणीनंतर त्याला उपचार करण्यासही टाळाटाळ करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्यामुळेच विजय सिंग या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी आणि विजय सिंग याच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान मानव अधिकार आयोगाची भेट घेतल्यानंतर आणि राष्ट्रवादीमार्फत तक्रार दाखल केल्यानंतर मानव अधिकार आयोगाने १४ नोव्हेंबर २०१९ ही तारीख दिली आहे. या तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अॅड. आनंद काटे ही केस लढवणार आहेत.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा आरोप, एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला ! मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करावी

मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *