… तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली ? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

पेगॅसस स्पायवेअर’ची निर्मिती करणारी इस्त्रायली कंपनी ‘एनएसओ’ सोबत कोणताही व्यवहार झालेला नाही असे संरक्षण मंत्रालय सांगत असेल तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली. ही घटना अधिक गंभीर असून याच्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ चौकशी समिती नेमावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

संरक्षण मंत्रालय ‘एनएसओ’सोबत व्यवहार केला नसल्याचे सांगत आहे. मात्र केंद्रसरकारने संसदेत येऊन सरकारच्या कुठल्याही एजन्सीने पेगॅसससोबत व्यवहार केलेला नाही किंवा सेवा घेतलेली नाही हे स्पष्ट सांगावे. समजा केंद्रसरकारने कोणतीही सेवा घेतलेली नाही हे खरे असेल तर केंद्र सरकारने संसदेत येऊन स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी त्यांनी केली.

संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी सांगत असतील तर तो केंद्र सरकारचा खुलासा होत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, वकील, पत्रकार, विरोधी पक्षनेते यांचे फोन टॅप केले जातात आणि दुसरीकडे केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय व्यवहार केला नाही असे सांगत असेल तर ही घटना गंभीर आहे. केंद्रसरकारने पुढे येऊन यावर स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

पेगॅसिसप्रकरणावरून सध्या सर्वोच्च न्यायालयात सुणावनी सुरु आहे. तसेच याप्रश्नी एका संकेतस्थळाने जाहिर केलेल्या माहितीवरूनही देशभरात खळबळ उडाली असून संसदेतही याप्रश्नावरून विरोधकांकडून चर्चेची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पेरॅसिसचे सॉफ्टवेअर खरेदी करण्याबाबत कोणताही व्यवहार झालेला नसल्याचा खुलासा करणे यावरून याप्रकरणाचे गांभीर्य वाढत आहे. मात्र केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर व हडपसर - यवत या उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *