पुरोगामी भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ हरयाणातील बलात्काराच्या घटनेचा निषेध करत खा. सुप्रिया सुळे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

पुरोगामी विचाराच्या भारतात महिलांवर होणारे बलात्कार वाढतच चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत असा सवाल करतानाच आज हरियाणामध्ये मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेचा जाहीर निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रामध्येही सातत्याने मुलींची होणारी छेडछाड,बलात्कारअशा गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होवून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे.सरकारच्या क्राईम रिपोर्टमध्ये अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. याचं उत्तर कोण देणार असा संतप्त सवालही खासदार त्यांनी यावेळी केला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे असा आरोप करतानाच त्या घटनेचा जाहीर निषेध त्यांनी केला.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांची माहिती, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार, ‘मिसिंग लिंक’: १ मेला उद्घाटन घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक; वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *