आमदार आव्हाड, दाभोळकर, मानव यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा दया राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई  : प्रतिनिधी

‘सनातन’च्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आणखी दोघांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा दयावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मिडियाशी बोलताना दिली.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ हे उपस्थित होते.

या भेटीमध्ये राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अंनिसचे पदाधिकारी श्याम मानव व मुक्ता दाभोळकर यांनाही ‘वाय प्लस’ या दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच यावर विचार करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले अशी माहितीही अजितदादा पवार यांनी मिडियाला दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार, पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली नको - बँकांना निर्देश

राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या तोंडावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *