मुंबईः प्रतिनिधी कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा वेळोवेळी आग्रह धरणाऱ्या शरद पवारांनी याच कायद्यातील सुधारणांविरोधात आंदोलन करणे म्हणजे पवारांनी स्वत: विरोधातच आंदोलन पुकारण्यासारखे आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, पक्षभेद विसरा- विकास कामासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा सर्वपक्षिय खासदारांच्या बैठकीत आवाहन
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी …
Read More »जात प्रमाणपत्र न दिलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक शुल्काचा लाभ व्यावसायिक अभ्यासक्रमास संस्था स्तरावर प्रवेश मिळवलेल्यांना होणार फायदा
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप राउंड) माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा दिलासा मिळवून दिला. ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जाची पोहोच सोबत जोडली आहे, परंतु २० जानेवारीपर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही, अशा मेरिट …
Read More »मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवीन समितीचा निव्वळ फार्स, अहवाल आधीच तयार! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार करून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स करण्यात येत आहे. यातून मुंबईकरांना मेट्रो विलंबाने मिळेल आणि राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. याबाबत प्रशासकीय अधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांची मोठी दिशाभूल होत असल्याचा आरोप एका पत्राद्वारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »१०-१२ वीच्या परिक्षेच्या तारखा जाहिरः बालविवाह होवू नये यासाठी प्रयत्नशील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १० वी ची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येणार असून निकाल ऑगस्ट २०२१ मध्ये निकाल जाहिर करण्यात येणार आहे. तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधी घेण्यात येणार असून जुलै २०२१ मध्ये १२ वीचा निकाल जाहीर …
Read More »शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी “स्टार्स” प्रकल्पाची अंमलबजावणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण ( Strengthening Teaching-learning and Results for States- STARS ) करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित, केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश व केरळ अशा एकूण सहा …
Read More »शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्यास खाजगी बँकांना परवानगी राज्य सरकारचा खासगी बँकांबाबत युटर्न
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने पोलिस कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांची पत्नी कार्यरत असलेल्या बँकेत वळविल्याविल्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उडविली. तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेत विराजमान झाल्यानंतर खाजगी बँकामधील शासनाकडून जमा करण्यात येणारे वेतन पुन्हा राष्ट्रीय बँकेतील खात्यातच भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या निर्णयास ७ ते ८ महिन्याचा …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभूत-विजयी उमेदवारांनो आता हिशोब सादर करा ट्रू व्होटर ॲपद्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा
मुंबई: प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ट्रू व्होटर मोबाईल ॲपद्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. मदान यांनी सांगितले …
Read More »विधानसभाध्यक्ष पदाकरिता या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची नावे आघाडीवर
मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या ठिकाणी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला प्रथम पसंती असून त्यांच्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नावाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उचलबांगडी होणार असल्याच्या चर्चेने …
Read More »ग्रामीण भागातील मुलींना, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना १० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी राहण्याकरिता ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय मुलींना …
Read More »
Marathi e-Batmya