मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे या वर्षाच्या …
Read More »सर्व जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा : जात पडताळणीसाठी ६ महिन्याची मुदतवाढ मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यानाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही …
Read More »१२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल केव्हा लागेल याकडे विद्यार्थ्यांसह सर्व पालकांची उत्सुकता लागू राहीली होती. अखेर १२ वीचा निकाल उद्या १६ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. १२ वीची परिक्षा संपल्यानंतर आणि १० …
Read More »कोरोना कामासाठी अधिकाऱ्यांची गरज असल्यानेच योग्य व्यक्तीला प्रशासक नेमा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी ग्रामपंचावतीवरील प्रशासकिय अधिकाऱ्यांऐवजी योग्य व्यक्तीला अर्थात राजकिय कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचा आदेश नुकताच काढला. त्यास राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेताच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात प्रसिध्दी पत्रक काढत कोरोनाच्या कामासाठी अधिकाऱ्यांची गरज असल्याने त्याच प्रवर्गातील व्यक्तीकडे ग्रामपंचायवर प्रशासक म्हणून नेमण्यासंदर्भात सर्व …
Read More »ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र
मुंबई: प्रतिनिधी मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेला आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली. या पत्रात देवेंद्र …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला स्थगिती नाही मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडली व विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिल्याची माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम …
Read More »राज्यातील तरूणांना प्रशिक्षण आणि रोजगार देणार जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देण्याचा संकल्प - नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी नोकरी इच्छूक उमेदवार आणि उद्योजकांमध्ये सांगड घालण्यासाठी महास्वयंम आणि महाजॉब्ससारखी संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत. सध्याची लॉकडाऊनची स्थिती बघता राज्यभरात ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी तसेच रोजगार इच्छूक तरुण यांना नोकरीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागामार्फत ऑनलाईन समुपदेशन करण्यात येत आहे. आता लवकरच दहावी …
Read More »या भागातील वीज ग्राहकांच्या बिलातील स्थिर आकार माफ ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी निसर्ग चक्री वादळामुळे महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात वीज वितरण यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले. बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाले. अजूनही काही ठिकाणी काम सुरु आहे. वादळामुळे वीजपुरवठा बाधित झालेल्या वीज ग्राहकांचा स्थिर आकार माफ करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या केली. मंगळवारी मंत्रालयात …
Read More »राजस्थानमधील राजकिय पेचामुळे रखडली नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती पटोले, चव्हाण आणि सातव यांच्या नावाची चर्चा
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे रोखल्या गेलेल्या काँग्रेस पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या व्हायला सुरुवात झाली. तसेच नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्तीही लवकरच होणार होती. मात्र राजस्थानात राजकिय पेच निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची निवड रखडल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. साधारणत: पाच वर्षापूर्वी सत्तेतून पायाउतार झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी आक्रमक …
Read More »विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले. यासंदर्भात महाराष्ट्र …
Read More »
Marathi e-Batmya