मुंबईः प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक,सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन करत आहे. भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे …
Read More »एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही? विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही, अशी विचारणा करून या नकारात्मक व उदासीन भूमिकेतून सरकारची असंवेदनशीलता दिसून आल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. प्रभादेवी अर्थात जुन्या एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेला एक वर्ष झाल्याच्या अनुषंगाने …
Read More »भाजप प्रदेशमधील लोकशाही पध्दतीचा आमदार गोटे यांच्याकडून निषेध गिरीष महाजनांच्या नियुक्तीमुळे भाजपमधील धुसफुस बाहेर
मुंबईः प्रतिनिधी राज्यात सत्तेस्थानी असलेल्या भाजपमध्ये एकाधिरशाहीचा अनुभव सरकार पातळीवर सुरु आहे. मात्र त्याचे अनुकरण पक्षाच्या कामकाजातही पडताना दिसत असून धुळे महापालिकेच्या आगामी निवडणूकीच्या निमित्ताने स्थानिक नेतृत्वाकडे जबाबदारी सोपविण्याऐवजी बाहेरील व्यक्तीकडे अर्थात जळगांवचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा गिरीष महाजन यांची प्रभारी पदी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्याने धुळे शहरातील …
Read More »दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका मुठा कालवा फुटल्याप्रकरणी अजित पवार यांची मागणी
पुणेः प्रतिनिधी शहरातील दांडेकर पूल परिसरातील मुठा कालव्याचा बांद कोसळून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे कालव्याचं हजारो लीटर पाणी पर्वती भागातील झोपडपट्टीत घुसलं. पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेकांचे संसार वाहून गेले. अकस्मात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोरगरिबांचं आर्थिकदृष्ट्या नुकसान झालंच; परंतु मानसिकरीत्या देखील ते खचले आहेत. यापुढे कसं होणार? असा प्रश्न पडलेल्या पूरग्रस्तांची …
Read More »न्यायालाच्या निकालाने शहरी नक्षलवादावर शिक्कामोर्तब माओवादी नक्षलींना गजाआड जावे लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचन्याप्रकरणी कम्युनिस्ट विचारांच्या चार अभ्यासकांवर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य ठरत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची नजर कैदेतील अटक आणखी चार आठवड्यांनी वाढविल्याने शहरी नक्षलवादावर एकप्रकारे शिक्कामोर्तब होत असून त्यांना गजाआड जावेच लागणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशातील वाढता …
Read More »विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपा कार्यकर्त्यांना सूचना
मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले सरकार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त असून भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत केली. …
Read More »भाजपा विरोधात मुद्दा नसल्याने विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला देशात व महाराष्ट्रात सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करूनही सांगली व जळगाव महानगरपालिकांमध्ये भाजपाचाच विजय झाला. विरोधकांना भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा सापडत नसल्यामुळे त्यांनी दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. …
Read More »मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बनावे सरकार प्रश्नांपासून पळ काढणारे नसून प्रतिसाद देणारे असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
ठाणे : प्रतिनिधी मराठा, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रामाणिक आणि गांभीर्याने प्रयत्न करीत असून ही स्व. अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, व्यवसाय–रोजगार यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत मराठा तरूणांनी नोकऱ्या …
Read More »बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा एसटीचा प्रवास होणार मोफत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीना एस.टी. प्रवास मोफत देण्याचा निर्णय राज्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच एस.टी. महामंडळाच्या सवलतींची व्याप्ती वाढवण्याच्या निर्णयांर्तंगत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. यापूर्वी दहावी पर्यंतच्या …
Read More »शरद पवारांनी खोटं बोलू नये भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर पलटवार
मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी वगळता काँग्रेस आणि एमआयएमशी आघाडी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून भारिपवर टीका केली. त्याचा खरपूस समाचार घेत १९९७-९८ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या बरोबर झालेल्या समझोत्यानुसार निवडणूक लढविली. त्यावेळी झालेल्या समझोत्यात शरद पवार हे …
Read More »
Marathi e-Batmya