मुंबई: प्रतिनिधी राज्य दुष्काळात होरपळत असताना, तिजोरीत खडखडाट असताना आणि राज्य कर्जबाजारी झाले असताना शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमासाठी ग्रामविकास खाते करत असलेल्या दोन कोटी रूपयांची उधळपट्टी कशाला, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केला. मोदी लाट पूर्णपणे ओसरल्याने शासकीय खर्चाने माणसे आणण्याची …
Read More »आदिवासींना घरे देण्यावरून राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री संघर्षाच्या पावित्र्यात राज्यमंत्री वायकर ४८० चौ.फुटाचे घर देणार तर मुख्यमंत्री म्हणतात ३०० चौ.फुटाचे घर देवू
मुंबईः प्रतिनिधी आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली. मात्र इतक्या मोठ्या आकाराची घरे आदिवासीना देता येणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींना ३०० चौरस फुटाची …
Read More »भाजप कार्यालयापासून राष्ट्रवादीच्या एल्गार आंदोलनास सुरुवात पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक
मुंबईः प्रतिनिधी वाह रे मोदी तेरा खेल…घरपोच दारु महेंगा तेल…मोदी सरकार हाय हाय… सरकार हमसे डरती है…पुलिस को आगे करती है… महागाई रद्द झालीच पाहिजे…लोडशेडिंग रद्द झालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई राष्ट्रवादीच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आणलेले ‘गाजर’ चक्क …
Read More »सरकारच्या आशिर्वादानेच कट्टरतावादी बेफाम काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी राज्यभरामध्ये अतिरेकी कारवाया करणा-या सनातन संस्थेशी संबंधित अनेक जणांना रंगेहात पकडले असतानाही सनातन संस्था आणि त्यांच्या प्रमुखांवर अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून २००८ साली झालेल्या बॉम्ब स्फोटात सनातनच्या साधकांचा हात होता हे पुढे आणले आहे. असे असतानाही राज्य सरकार …
Read More »दारू नको तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले
मुंबईः प्रतिनिधी घरपोच ऑनलाईन दारू पोहोचविण्याचा प्रकार आक्षेपार्ह व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली. काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला घरपोच दारू पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यावर एकाबाजूला राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत …
Read More »सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत विदयार्थ्यांवर अन्याय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत ८३३ विदयार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्या भविष्याचा विचार करुन राज्यसरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह ( परिवहन) विभागातंर्गत २३ डिसेंबर २०१६ ला …
Read More »मंत्रिमंडळ विस्ताराच्या वृत्तामुळे युतीतील आमदारांची चुळबुळ वाढली शिवसेनेच्या अल्पसंतुष्ट आमदारांवर भाजपची नजर
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भाजप शिवसेनेच्या सरकारला येत्या ३१ ऑक्टोंबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. तर त्यातच नोव्हेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने नेहमीप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराचे वेधही लागले आहेत. किमान या राहिलेल्या १ वर्षाच्या कालावधीत तरी राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागांवर आपली वर्णी लागावी म्हणून भाजप आणि शिवसेनेतील इच्छुक आमदारांनी …
Read More »राज्यातल्या तरूणांनो आता खेळा आयुष्यमान भारत क्रिकेट ते स्वच्छ भारत कुस्ती २८८ मतदारसंघातील ७५ दिवसांची मुख्यमंत्री चषक स्पर्धा
मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत राज्यातील सर्वच राजकिय पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र भाजपने या सर्व पक्षांवर मात करत भाजपच्या युवा मोर्चाकडून थेट ५० लाख तरूण मतदारांशी संपर्क करण्यासाठी आणि शासकिय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री चषक स्पर्धेतंर्गत शासकीय योजनांच्या नावावर आधारीत आयुष्यमान क्रिकेट ते …
Read More »पॅरा ऑलंपिकमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या दिव्यांगांसाठी क्रिडा प्रबोधिनी स्थापणार सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी पॅरा ऑलंपिकमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या आणि इच्छूक दिव्यांगांसाठी मुंबई अथवा पुणे येथे क्रिडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येईल, यासाठी जागेचे उपलब्धता जेथे होईल तेथे प्राधान्याने प्रबोधिनी सुरू करण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्या विकास विभाग, वैद्यकिय शिक्षण आणि अपंग विभागाची संयुक्त समिती स्थापन करून दिव्यांगांना उच्च शिक्षणात तज्ज्ञ अध्यापक, …
Read More »शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी जनतेकडून सरकार वसूल करणार पैसे सौर ऊर्जा कृषी पंपासाठी लागणाऱ्या निधी उपलब्धतेसाठी ऊर्जा विभागाचा विचार
मुंबईः प्रतिनिधी राज्यातल्या आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असल्याचा दावा राज्य सरकार करत असली तरी तिजोरी रिकामीच असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस येत आहे. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या सौर कृषी पंपासाठी लागणारा निधी राज्यातील वीज ग्राहकांच्या खिशातून प्रत्येकी वसूल करण्याचा विचार ऊर्जा विभागाकडून करण्यात येत असून कृषी पंपासाठी लागणारा १७०० कोटी रूपयांपैकी …
Read More »
Marathi e-Batmya