राजकारण

नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनात आता शरद पवारांचीही उडी भेट दिल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट करण्याचे पवारांचे प्रकल्पग्रस्तांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील संभावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवित काही स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्याविषयीची कैफियत मांडली. यासंदर्भात नाणार  प्रकल्पाच्या ठिकाणी १० मे रोजी जाणार असून तेथील स्थानिकांशी चर्चा करणार आहे. तसेच प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर याबाबतची भूमिका जाहीर करणार असल्याचे शरद …

Read More »

चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करण्यास काँग्रेसचा पाठिंबा अपयशी ठरल्याने मोदींकडून उपोषणाचे ढोंग: अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या केली. चायरे कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचा त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. कुटुंबियांच्या मागणी प्रमाणे चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर …

Read More »

मुख्यमंत्री जरी फितूर झाले तरी नाणार प्रकल्पाला विरोधच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरी प्रकल्पा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील स्थानिक जनतेवर लादणार नसल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही केंद्राने हा प्रकल्प नाणार रहिवाशांवर लादला असून मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत नसल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत मुख्यमंत्री पिचक्या पाठ कण्याचे निघाल्याचा आरोप केला. …

Read More »

विरोधकांच्या उपोषणाला भाजपचे निषेध उपोषणाचे प्रतित्तुर पंतप्रधान, मुख्यमंत्री, अमित शहासह केंद्रीय मंत्री, आमदार-खासदारांचे देशभरात उपोषण

मुंबई : प्रतिनिधी देशात शांतता आणि सलोखा कायम रहावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकारात्मक कारभाराच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसने देशभरात एकदिवसीय उपोषण केले. त्यास प्रतित्तुर म्हणून भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांनी कामकाज चालू दिले नसल्याच्या निषेधार्थ आज एकदिवसीय उपोषण करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

नारायण राणेंची कसोटी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागणार असून यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पर्यायाने नारायण राणे यांच्या राजकीय नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे. काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामीलही केला. राज्याच्या राजकारणात राहण्याची शक्यता मावळल्यानंतर …

Read More »

पोलिस आयुक्तालयाला मंजूरी मात्र कार्यालयासाठी जमिनच नाही राज्य मंत्रिमंडळाची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीस मंजूरी

मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र महापालिकेची स्थापना केल्यानंतर स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने या मागणीची दखल घेत पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीस मंजूरी दिली. परंतु या आयुक्तालयाच्या मुख्यालय उभारणीसाठी अद्याप जमिनच उपलब्ध करून न दिल्याने …

Read More »

गुन्हेगारीमुळेच मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यातले शिवसैनिक आक्रमक होते. मात्र त्यांना आता शिवसेनेच्या नेत्यांनी शांत केल्याचे सांगत शिवसेना आक्रमक आहे, पण गुन्हेगार नसल्याचे प्रमाणपत्र देत केवळ गुन्हेगारीमुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडाचा पक्ष असल्याची अप्रत्यक्ष आरोप गृह राज्यमंत्री …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारा विरोधात काँग्रेसचे एक दिवसीय उपोषण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिके आणि कारभारामुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कारभाराच्या निषेधार्थ आणि देशात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे उद्या ९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र …

Read More »

तुमची औकात तरी आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सरकारवर टीका

सातारा- दहिवडी : प्रतिनिधी नुकत्याच मुंबईत झालेल्या भाजपच्या महामेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करत चहावाल्यांच्या नादीला लागाल तर तुम्ही औषधालाही शिल्लक राहणार नसल्याची टीका केली. त्या टीकेचा खरपूस समाचार घेत पवार साहेबांचे बोट पकडून यांचे गुरु राजकारणात आले आणि हे भाजपचे …

Read More »

भाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

सोलापूर-टेंभुर्णी : प्रतिनिधी सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा शब्दात अजित पवारांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. धरणात पाणी भरलेलं असतानाही शेतकऱ्यांना पाणी देत नाहीय. वीज कनेक्शन तोडण्याचे काम करत …

Read More »