बँलेट पेपरवर निवडणूका घ्या आणि संशय दूर करा कर्नाटकच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उपरोधिक टीका करत मागणी

मुंबई : प्रतिनिधी

प्रत्येक निवडणूकीत लागणारे निकाल हे वेगवेगळे असतात. त्यानुसार कर्नाटक विधानसभेचा निकाल लागलेला आहे. एकाबाजूला देशातील पोटनिवडणूकांमध्ये भाजपचा पराभव होत आहे. त्यामुळे मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएम मशिन्सबाबत संशय निर्माण होत आहे. त्यामुळे भाजपने एकदा बँलेट पेपरवर निवडणूका घेवून लोकांच्या मनातील शंका दूर करावी अशी उपरोधिक मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज मंगळवारी जाहीर झाले. या निकालांचे कल जाहीर होतानाच भाजपला १०० हून अधिक जागा मिळाणार असल्याचे स्पष्ट होताच उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना त्यांनी वरील मागणी केली.

दरम्यान, कर्नाटक राज्यात भाजपने मारलेल्या मुसंडीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जे जिंकले त्यांचे अभिंदन. मात्र जिंकून सत्तेवर आलेल्यांनी कर्नाटकातील मराठी माणसांचा सन्मान करावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशिन्सचा विजय असो अशी खोचक टीका करत यावर स्पष्टपणे बोलण्याचे टाळले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *