राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांची पांडुरंगाला प्रार्थना, बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला…. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सहकाऱ्यांसह पालखी सोहळ्यात सहभाग

राज्यातील बळीराजा आज हवालदिल झालेला आहे, अवकाळी पावसाने शेतातील उभं पिक वाया गेलं, शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचे जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि आता विश्वात्मके देवे, ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात, अशी प्रार्थना पांडुरंग चरणी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार

पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मिती तर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे  सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत.या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना …

Read More »

एसटी महामंडळाने जाहिर केली श्वेतपत्रिका, ४५ वर्षात फक्त ८ वर्षे नफ्यात येत्या ४ वर्षात एसटीला फायद्यात आणणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गेली अनेक वर्षे सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या ४ वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर तसेच सर्व खात्याचे …

Read More »

आशिष शेलार यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही, तर पुर्वीपासून पाचवी ते आठवी पर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली व अन्य पर्याय उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा या अवाजवी, अतार्किक …

Read More »

राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीसाठी वॉररुम तयार करण्यात आली आहे. या वॉररुमच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन सामाजिक क्षेत्रातील योजना, उपक्रम व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तांत्रिक, विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक सहाय्य पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स (सीईजीआयएस) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील वर्षा या …

Read More »

विधानसभा निवडणुकः वाढलेल्या ७६ लाख मतांच्या याचिकेवर २५ जूनला निकाल प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या याचिके संदर्भात याचिकेवर अंतिम निकाल

राज्यातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत आक्षेप नोंदवित वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी त्यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट …

Read More »

आषाढी वारीच्या दिंडीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मंगळवारी २४ जून रोजी दिवसभर दिंडीसोबत चालणार

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व विठ्ठल भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. वारीत सहभागी होऊन विठ्ठल भक्तीत रममान होण्याचा मानस अनेकांचा असतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही वारीत चालण्याचा संकल्प केला आहे. मंगळवार दिनांक २४ जून रोजी सपकाळ हे दिंडीत सहभागी होत असून ते …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, महिलांसंदर्भात देशातील पहिलं धोरण हे महाराष्ट्रात तयार केलं महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी प्रयत्न होणं गरजेचे-सुप्रिया सुळे

महिलांसंदर्भात देशातील पहिलं धोरण हे महाराष्ट्रात तयार केलं गेलं. सुदैवाने त्यावेळेला राज्याची सूत्रं माझ्याकडे होतं. पण निर्णय घेताना अनेक वेळेला कुठे ना कुठेतरी विरोध होत होता. मानसिकता बदलायची आवश्यकता होती. समाजातल्या पुरुष वर्गाची ती मानसिकता त्या काळात बदलली नव्हती. हल्ली सुद्धा तीच मानसिकता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळते. असे राष्ट्रवादी …

Read More »

द्रास येथील भारतीय लष्कराला ‘लेझर शो’ साठी राज्य शासनाकडून तीन कोटींची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा धनादेश सैन्यदलाकडे सुपूर्द

कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्याना व्हावी यासाठी सरहद्द संस्थेच्या पुढाकाराने तयार करण्यात येत असलेल्या ‘लेझर शो’च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने तीन कोटींचा निधी देण्याचे शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केले होते. यंदा कारगिलच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले असता आपण दिलेला शब्द पाळत त्यांनी हा तीन कोटींचा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत बैठक

नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल़, असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत …

Read More »