राजकारण

सुप्रिया सुळे यांचा सवाल, वाल्मिक कराडवर ईडी ची कारवाई का नाही? संतोष देशमुख हत्या प्रकरणी थेट केंद्र सरकारवर निशाणा

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला आरोपी वाल्मिक कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच नोटीस दिली होती. मात्र, कुठलीही कारवाई न झाल्याने वाल्मिक कराड बिनधास्त असून वेळेवर ईडीने कारवाई केली असती तर सरपंच हत्याप्रकरण घडलंच नसतं, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया …

Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती

मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या १०० दिवस नियोजनाचा आढावा

राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसात मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे …

Read More »

औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्याव्यात. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे …

Read More »

आता राजघाटावर डॉ मनमोहन सिंग याचे नव्हे तर प्रणव मुखर्जी यांचे स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तसे पत्र शर्मिष्ठा मुखर्जी यांना दिले

केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची समाधी उभारण्यासाठी “राष्ट्रीय स्मृती” संकुलात (राजघाट परिसराचा एक भाग) एक नियुक्त जागा निश्चित करण्यास मान्यता दिली आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हिने आज त्यांना शहरी व्यवहार मंत्रालयाकडून मिळालेले पत्र शेअर केले आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि या …

Read More »

अतुल सावे यांचे आदेश, विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर करा इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर दिले आदेश

इतर मागास प्रर्वगातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वसतिगृह मिळण्याबाबत तसेच येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर करून या कामाला प्राधान्य द्यावे, असे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागाची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. मंत्री अतुल सावे म्हणाले की, इतर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, कोणत्या तोंडाने स्वतःला विश्वगुरू म्हणवता पंतप्रधान मोदी अजून किती इज्जत घालवणार ?

बांग्लादेशने भारतातील ५० न्यायाधीश, न्यायिक अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी, आणखी किती अपमान होऊ देणार, कोणत्या तोंडाने तुम्ही स्वतःला जगाचा नेता म्हणता, ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचे काय झाले? असा …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, असं कसं चालणार ? कांदा व दूध दरवाढीसाठी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन

कांदा व दूध दर वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बारामती आज आंदोलन करण्यात आले पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह युवा नेते योगेंद्र पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेले शेतकऱ्यांना आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी …

Read More »

सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

भाजपाच्या सुरु असलेल्या संघटन पर्वा अंतर्गत १० जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, पंचायती पासून पार्लमेंट पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम 'सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करावे' – मुख्यमंत्री

सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला …

Read More »