राजकारण

राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार नव्या आर्थिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खासगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. फास्ट टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सूसुत्रता, पारदर्शकता …

Read More »

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर ५ फेब्रुवारीला मतदान तर ८ फेब्रुवारीला निकाल

दिल्लीत ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि तीन दिवसांनी अर्थात ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे, सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप), त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाची राजकिय प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या दमदार कामगिरीनंतर आणि काही महिन्यांपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे मुदतीत पूर्ण करा राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे दिलेल्या मुदतीत गतीने पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळांच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे …

Read More »

राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी योजना राबविण्यात येतात. प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी. प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली. गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून …

Read More »

एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरण व्यवसाय वृद्धीसाठी सल्लागार नियुक्त करा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती

एन डी स्टुडिओचे अद्ययावतीकरण करुन तेथे चित्रपट निर्मिती व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावे. व्यावसायिक कृती आराखडा तयार करुन एनडी स्टुडिओची आर्थिक सक्षमता वाढविण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. मंत्रालयात एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान …

Read More »

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षिय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी आहेत. तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे सख्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत स्वराज्य पक्षाचे …

Read More »

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून शरद पवार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र गुंडापासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व राजकिय पक्षांकडून देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वपक्षियांकडून करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड हे सीआयडीसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर याप्रकरणी राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, साईभक्तांना भिखारी म्हणणाऱ्या सुजय विखेला सत्तेचा माज साईभक्तांना मोफत प्रसाद लाखो भक्तांच्या दानाच्या पैशातून; सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही

शिर्डीत देशभरातील लाखो भाविक साईबाबाचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिखारी म्हणाणारा भाजपाचा माजी खासदार सुजय विखे याला सत्तेचा माज आहे. सरंजामी मस्तीतून त्याने साईभक्तांचा अपमान केला. अन्नछत्रातील जेवणाचा खर्च साईभक्तांनी केलेल्या दानातील पैशातून केला जातो, सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही, असे खडेबोल सुनावून साईभक्तांचा अपमान करणाऱ्या सुजय विखेने …

Read More »

डॉ सुजय विखे-पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य, सगळे भिकारी शिर्डीत जेवणासाठी… अन्नदान संस्थानने बंद करावे

भाजपाचे माजी खासदार तथा विद्यमान मंत्री डॉ राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे-पाटील यांनी आज शिर्डीत येणाऱ्या भक्तांच्या अनुंगाने उद्देशाने संपूर्ण देशात सध्या फुकट जेवण वाटप केले जात आहे. त्यात आता महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत जेवणासाठी येत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. डॉ सुजय विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

मुख्यमंत्री आतिशी सिंग यांच्यावर भाजपाचे रमेश बिधुरी यांची आक्षेपार्ह टीका आतिशी सिंग यांनी वडील बदलले

कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांची वैयक्तिक खिल्ली उडवल्यानंतर त्यांनी “तिने वडील बदलले” असा दावा केल्याने आणखी एक वाद निर्माण झाला. राष्ट्रीय राजधानीत एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना रमेश बिधुरी म्हणाली, “आतीशी, जी मार्लेना होती, ती आता सिंग आहे. तिने तिचे वडील देखील …

Read More »