प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, कोणत्या तोंडाने स्वतःला विश्वगुरू म्हणवता पंतप्रधान मोदी अजून किती इज्जत घालवणार ?

बांग्लादेशने भारतातील ५० न्यायाधीश, न्यायिक अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी, आणखी किती अपमान होऊ देणार, कोणत्या तोंडाने तुम्ही स्वतःला जगाचा नेता म्हणता, ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचे काय झाले? असा सवालही केला.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना ऑगस्टमध्ये ढाका सोडून पळून जावे लागले होते. या नंतर त्या भारतात आल्या. त्यामुळे भारत आणि बांग्लादेशचे संबंध ताणले गेले आणि याचमुळे बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने रविवारी भारतातील ५० न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला. फेब्रुवारीमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण सत्र होणार होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *