राजकारण

संजय राऊत यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर, खरे तर भाजपाला राग यायला पाहिजे, इतरांना नाही मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, पक्ष सोडण्यासाठी किती जणांवर दबाव

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात जाणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमची वकिली कुणीही करायची गरज नाही. जे काही आमच्या पक्षाबाबत सांगायचं आहे ते आम्ही सांगू इतरांनी त्यात पडू नये असा इशारा संजय राऊत यांचं नाव न घेता दिला. यानंतर आता संजय राऊत यांनी …

Read More »

अजित पवार यांच्या खोचक टोल्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर, मविआचे आम्ही चौकीदार…. जी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती तशीच आम्हीही घेतली

मागील तीन-चार दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना अजित पवार यांनी मंगळवारी १८ एप्रिल रोजी पूर्णविराम दिला. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचा अजित पवारांनी …

Read More »

काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य,…ती दोन माकडं पोसलीत विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचे काम सुरुय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत विचारलं असता त्यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी १८ एप्रिल रोजी अकोला येथे पत्रकारांनी …

Read More »

राज्यातील शाळा १५ जून पासून पण विदर्भातील ‘या’ तारखेपासून होणार सुरु शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात …

Read More »

अखेर त्या चर्चांवर अजित पवार स्वतःच म्हणाले, ‘अरे बाबांनो… ‘ध’ चा ‘मा’ करु नका ना… बोलणार्‍यांची बातमी देण्याऐवजी अजित पवार का बोलले नाही, 'अरे एवढे प्रेम का ऊतू जातेय माझ्यावर'...

मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात पुन्हा राजकिय भुकंप होऊन नवी सत्ता समिकरणे पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आले. अखेर या चर्चेवर राष्ट्रववादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच खुलासा करत म्हणाले, कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. …

Read More »

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित, अजित पवार यांनी सुनावले, केली ही मागणी दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा; मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर बाधितांना मोफत उपचारांसह ५ लाख रुपये मदत द्या

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, कृष्णा, पंचगंगेचे पूर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेशी निगडीत विविध योजनांबाबत कार्यवाहीचे निर्देश

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रीया तसेच अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठीचा नगरोत्थान योजनेतील १०० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून …

Read More »

काँग्रेस नेते वेणुगोपाल ठाकरे यांना भेटल्यावर म्हणाले, आम्ही उध्दव ठाकरेंच्या सोबत…भेटीचे निमंत्रण संयुक्त पत्रकार परिषदेत दिली चर्चेची माहिती

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज मातोश्री येथे जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेणुगोपाल यांनी माध्यमाशी बातचित केली. वेणुगोपाल म्हणाले की, उद्धव ठाकरे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत आणि या लढाईत काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हाच निरोप घेऊन मी …

Read More »

मलिक यांच्या त्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, ते भाजपाच्या विचारांचे… पुलवामा प्रकरणावेळी ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, लाखो लोक रखरखत्या उन्हात अन् VIP लोक मात्र AC त, हा कुठला न्याय? शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन होते. या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका कार्यक्रमाला आलेल्या श्रीसदस्यांना बसला व उष्माघाताने १३ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला व ५०० च्या वर रुग्णालयात उपचार घेत आहेत, ही घटना अत्यंत वेदनादायी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. हा …

Read More »