अजित पवार यांच्या खोचक टोल्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर, मविआचे आम्ही चौकीदार…. जी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती तशीच आम्हीही घेतली

मागील तीन-चार दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना अजित पवार यांनी मंगळवारी १८ एप्रिल रोजी पूर्णविराम दिला. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचा अजित पवारांनी समाचार घेतला. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी देखील अजित पवारांबाबत भाष्य केलं होतं. तसेच शिवसेनेच्या मुखपत्रातून यावर टिप्पणी केली होती. यालादेखील अजित पवारांनी आज उत्तर दिले. त्यानंतर संजय राऊत यांना अजित पवारांच्या त्या टोल्याबाबत विचारले असता राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले.

अजित पवार संजय राऊतांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्याबद्दल सांगा. ज्या पक्षाचं मुखपत्र आहे, त्याबाबत बोला. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडण्यास खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र कोणी घेण्याचं कारण नाही. आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते मग ते राष्ट्रीय किंवा राज्यातील स्तरावर मजबूत आहे.

अजित पवारांनी खडसावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, मी महाविकास आघाडीची बाजू मांडतोय. आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. या आघाडीचं रक्षण करणं आमचं काम आहे. अजित पवारही या आघाडीचे चौकीदार आहेत. अजित पवारांनी माझ्यावर टीका केली की नाही ते मला माहिती नाही. आम्ही त्यांच्या बदनामीवर भूमिका मांडली. ही बदनामी योग्य नाही असं आम्हाला वाटतं. शिवसेना फोडल्यानंतर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेतली होती. यावेळी देखील तसाच प्रयत्न राष्ट्रवादीबाबत सुरू होता. त्यामुळे आम्ही भूमिका घेतली. यात चुकीचं काय आहे.

About Editor

Check Also

जयकुमार रावल यांची माहिती, गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला चालना

महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यास नवी दिशा देणारा आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला चालना देणारा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *