राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना बदलत्या जीवनशैलीनुसार अधिक आधुनिक, सुसज्ज आणि प्रशस्त निवास सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवेंद्रसिंह राजे भोसले पुढे बोलताना म्हणाले की, या संदर्भात …
Read More »हर्षवर्धऩ सपकाळ यांची मागणी, कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही मदत केली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत, त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून कोकणच्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी …
Read More »अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज व्याज परतावा योजना अधिक सुलभ ऑनलाईन सुविधांमुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ, पारदर्शक आणि लाभार्थी-केंद्रित करण्यात आली आहे. सुधारित प्रणालीमुळे लाभार्थ्यांना आता अनेक प्रक्रिया स्वतःच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन पूर्ण करता येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक …
Read More »राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ कैद्यांच्या क्षमतेते १२ हजार २५८ ने वाढ होणार
राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण १२ हजार २५८ ने बंदी क्षमतेत वाढ होणार आहे. त्यापैकी पालघर, नारायणडोह (अहिल्यानगर) व बारामती (पुणे) येथे अनुक्रमे १८, ३५ व ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित …
Read More »हसन मुश्रीफ यांची माहिती, एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या विकास शुल्कातील बदल तसेच विद्यार्थ्यांना ओबीसी धर्तीवर शुल्क सवलतीबाबत शासन सकारात्मक
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक शुल्क सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्रालयामध्ये आज राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, सीबीआयचे दोनवेळा छापे, मग महाराष्ट्र पोलीस काय करत होते? महाराष्ट्रात ‘जामतारा’ सारख्या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा;
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे पण ‘जमतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर आरोप करत या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधिक्षक यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, नारीवंदन आरक्षण २०२४ पासूनच लागू करावं अशी मागणी, का केलं नाही? पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर संसदेचे विशेष अधिवेशन
खऱ्या अर्थानं जर नारी वंदन हा विषय संवेदनशीलता आणि जिव्हाळ्याचा राहिला असता भाजपचा, तर २०२३ साली हे बील जेव्हा पास झालं, त्यावेळेस काँग्रेसनं आग्रह धरला होता की २०२४ पासूनच हे आरक्षण लागू करावं, तेव्हा लागू का नाही केलं? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावेळी केला. पुढे बोलताना अतुल …
Read More »नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया स्थगित करा सर्वोच्च न्यायायलयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर माडंली भूमिका
अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भातील उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करावी तसेच या संदर्भातील बदर समितीचा संपूर्ण अहवाल त्वरित सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पाठवलेल्या पत्राद्वारे केली. नाना पटोले पुढे म्हणाले की, आरक्षण हा काही विशिष्ट व्यक्ती …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये ६००० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या क्वांटम क्षेत्रातील प्रगतीस मोठा वेग मिळाला. त्याचबरोबर, महाराष्ट्र शासनानेही या क्षेत्रात पुढाकार घेत ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू केले असून, उद्योग-सिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात असून, ही भारतातील …
Read More »हसन मुश्रीफ यांचे आवाहन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा
महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मंत्रालयामध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही वैद्यकीय महाविद्यालये …
Read More »
Marathi e-Batmya