हसन मुश्रीफ यांची माहिती, एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या विकास शुल्कातील बदल तसेच विद्यार्थ्यांना ओबीसी धर्तीवर शुल्क सवलतीबाबत शासन सकारात्मक

राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक शुल्क सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्रालयामध्ये आज राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक शुल्क सवलत देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे  संबंधित अधिकारी आणि विद्यार्थी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर वाढत्या आर्थिक ताणाचा विचार करून विकास शुल्कात आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे. तसेच एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याबाबत आणि संबंधित धोरण राबविताना शासनाच्या नियमांचा व आर्थिक तरतुदींचा तसेच उच्च व तंत्रशिक्षण आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करुन अंतिम  योग्य तो निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत योग्य तो तोडगा काढण्यात येईल तसेच शिक्षण सुलभ आणि परवडणारे करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

विविध शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील शुल्क रचना, विद्यार्थ्यांची आर्थिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक सुविधांचा दर्जा यांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *