राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन भाजपा महायुतीच्या हुकूमशाही व ठोकशाहीला धडा शिकवा भाजपाला वाजपेयी, मुंडे, महाजन, हेगडेवार व गोळवलकरही नको आहेत, रेशीमबागेत मोदी व शाहांचा फोटो बसवतील

राज्यातील २८८ नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगला कौल मिळाला असून ४१ नगराध्यक्षांसह १००६ नगरसेवक विजयी झाले आहेत. नगरसेवकांच्या २ हजार जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. नगरपालिका निवडणुकीतील हा झंझावात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसेल असा विश्वास व्यक्त करत लोकशाहीविरोधी भाजपा महायुतीच्या हुकूमशाही व ठोकशाहीला जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व सुरेश कलमाडी काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली!

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. सुरेश कलमाडी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सुरेश कलमाडी यांनी भारतीय वायुसेनेतल्या …

Read More »

सचिव तुकाराम मुंढे यांचे आदेश, दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करा बनावट प्रमाणपत्र प्रकरणात कडक कारवाई

दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण, विविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, अलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने यूडीआयडी कार्ड …

Read More »

नरहरी झिरवळ यांची माहिती, प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटींचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

राज्यभर प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने २ जानेवारी २०२६ रोजी ३१.६७ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा दम, एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस वर्षाअखेरपर्यंत दाखल करा निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास कठोर कारवाई

सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा …

Read More »

महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना ‘SHEBOX पोर्टल’वर नोंदणी करण्याचे आवाहन महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने शीबॉक्स (SHEBOX) पोर्टल तयार केले असून, सर्व आस्थापनांनी या पोर्टलवर आपले कार्यालय नोंदवणे अनिवार्य आहे. मुंबई उपनगरातील सर्व आस्थापनांनी तात्काळ या पोर्टलवर नोंदणी करून अंतर्गत समितीची तसेच कार्यालयाची अद्ययावत माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (मुंबई उपनगर) एस. टी. कुऱ्हाडे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल, भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत मनपा निवडणुकीत ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’ वगनाट्य

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु असून भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख

सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी मंत्री कृपा शंकर सिंह, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित …

Read More »

व्हेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

व्हेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. व्हेनेझुएलातील सद्यस्थिती पाहता, भारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावे, असे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, जे भारतीय नागरिक …

Read More »

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वचननाम्याच्या निमित्ताने भाजपावर हल्लाबोल महापालिकेच्या ठेवीवरून साधला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा

महापालिकेच्या ठेवीवरून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ठेवू काय चाटायला नसतात असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पलटवार करत म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे ठेवी काय चाटायला नसतात हे अशोभनीय वक्तव्य आहे. मला त्यांना सांगायचं की तुमचं म्हणणं एकदम …

Read More »