हसन मुश्रीफ यांचे आवाहन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांच्या प्रगतीचा  सविस्तर आढावा मंत्रालयामध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही वैद्यकीय महाविद्यालये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी.

या बैठकीत हसन मुश्रीफ म्हणाले की, प्रत्येक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांची प्रगती, निधी वितरण, मनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक सुविधा उभारणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कामांना गती मिळाली असली तरी काही प्रकल्पांबाबत तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश मुश्रीफ यांनी दिले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाई बद्दल संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई  करण्याचे निर्देशही दिले.

पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, रुग्णालयीन सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा यांची उभारणी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर दिला. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले. या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर संबंधित भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.

बैठकीस वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव संदीप ढाकणे उपस्थित होते तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुती सरकारकडून ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना हे गृहविभागाचे अपयश

महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *