काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतान यांचा लावण्यात आलेला फोटो काढल्यावरून म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामापासून प्रेरणा घेत टीपू सुलतान यांनीही इंग्रजाच्या विरोधात काम केले असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरून टीपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजासोबत …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, अभिभाषणात जुन्याच मुद्याची घासून पूसून उजळणी राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक
राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही.हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेक आहे. अभिभाषणात जुन्याच मुद्द्यांची घासून-पुसून उजळणी केली असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. …
Read More »राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ३ टक्के वाढ वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे विधानसभेत निवेदन
राज्य शासकीय व इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ५५ टक्क्यावरून ५८ टक्के अशी ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे निवेदन वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केले. राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने देण्यात येणार असून जुलै २०२५ …
Read More »महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती
महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विधानभवन येथे सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य कराराच्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, ब्रिस्टॉल …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली ग्वाही
पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये शेतक-यांचा समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेपासून राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तरी या …
Read More »डॉ पंकज भोयर यांची ग्वाही, किडनी घोटाळ्यातील आरोपींना मोक्का लावणार बेकायदेशीर सावकारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्यास भाग पाडल्याच्या खळबळजनक प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. या गंभीर घटनेनंतर, राज्य सरकारने बेकायदेशीर सावकारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे आणि आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागू करण्याची आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या …
Read More »गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे केंद्र नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी नाशिक येथील ताज गेटवे आयोजित गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले. या परिषदेत वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार, स्टार्टअप्स आणि परिसंस्था उभारणी करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता. शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला. …
Read More »परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना
राज्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने विविध कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेवर दिली. राज्यातील महामार्गावर चालविण्यात येत असलेल्या खासगी स्लिपर कोच बसेसच्या अपघातासंदर्भात सदस्य धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना परिवहन मंत्री …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा फसवणुकीचा संशय आल्यास लगेच १९३० वर संपर्क करावा
कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. अशा प्रकारचा कॉल, मेसेज किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो फसवणूक असल्याने डिजिटल ॲरेस्टचा फोन आल्यास नागरिकांनी तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. अशा प्रकरणात जनजागृतीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या वेळी …
Read More »
Marathi e-Batmya