५६ इंचाच्या पंतप्रधानांसाठी राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ मोहिम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ इंचाची छाती असल्याचे सांगणाऱ्या पंतप्रधानांसाठी ‘जवाब दो’ ही मोहिम सुरु करण्यात आली असून सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ सवाल सरकारला विचारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

केंद्र आणि राज्य सरकारला जवळपास साडेचार वर्षे झाली असून आतापर्यंत दिलेली आश्वासने देण्यात आली होती. परंतु ही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ५६ इंचाच्या पंतप्रधानांसाठी ५६ सवाल मोहिम ५ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन हे सवाल सरकारला केले जाणार आहेत. कालपासून हे सवाल विचारण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय फेसबुक अकाऊंटवरही हे सवाल केले जात आहेत. जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही पक्षाच्या माध्यमातून सरकारला करणार असून रोज एक सवाल विचारला जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

६ सप्टेंबरचा राष्ट्रवादीचा सवाल- कितने लोगोंके खातेमें १५ लाख रुपये आ गये मोदीजी? जवाब दो

About Editor

Check Also

उद्धव ठाकरे यांचा इशारा, होय, आम्ही रिजीम चेंजसाठी उभारलोय शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घोषणा

केंद्रात आणि राज्यात मत चोरीतून आलेल्या सरकारची सत्ता बदलण्यासाठी-रिजीम चेंज करण्यासाठी आम्ही उभे आहोत. कारण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *