प्रकाश आंबेडकर यांनी दिला सफाई कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा भाजपाला सफाई कामगारांविषयी सहानुभूती नाही

भाजपाला सफाई कामगारांविषयी कुठलीही सहानुभूती नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. विशेषत: त्या लोकांची जे हाताने मैला साफ करण्याच्या भयानक आणि अमानुष प्रथेत गुंतले असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेत धोरणात्मक सुधारणांमध्ये लक्ष देण्याची गरज आहे, ती धोरणांमधून काढून टाकण्याची नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातून हे काढून टाकणे म्हणजे, हाताने कचरा, मैला साफ करणाऱ्यांच्या प्रथेला स्वीकार न करणे आणि त्यांना सुरक्षा न देण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी (आणि बहुधा शेवटचा) हा एक निर्णय आहे.

शेवटी आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठीचा हा लढा थांबता कामा नये; हा लढा चालूच राहायला पाहिजे, सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी सुरू असलेल्या संघर्षाला आणि लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचेही यावेळी जाहिर केले.

About Editor

Check Also

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *