वंचित आघाडीच्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर सोलापूर-अकोला येथील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या एकूण ३७ उमेदवारांच्या नावांची घोषणा आज वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली असून धनगर समाजाला आजच्या यादीत पाच ठिकाणी तर माळी समाजाला दोन्ही ठिकाणी आणि बौध्द समाजाला चार ठिकाणी तर वडार, होणार, कोळी, कुणबी, मुस्लिम अशा सर्वच वर्गांना त्यात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. मात्र अकोला, सोलापूर या दोन मतदारसंघातील उमेदवारांची नावे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर करण्याचे टाळले.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची यादी
वर्धा-धनराज वंजारी, रामटेक-किरण रोडगे-पाटणकर, भंडारा-गोंदीया-एन.के.नान्हे, गडचिरोली-चिमूर-डॉ. रमेश गजबे, चंद्रपूर-अँड.राजेंद्र महाडोळे, यवतमाळ वाशिम-प्रा.प्रवीण पवार,
दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील उमेदवारांची यादी
बुलढाणा-बळीराम सिरसकार, अमरावती-गुणवंत देवपारे, हिंगोली-मोहन राठोड, नांदेड-यशपाल भिंगे, परभणी-आलमगीर खान अखिल मंहम्मद खान, बीड-प्रा. विष्णू जाधव, उस्मानाबाद-अर्जुन सलगर, लातूर-राम गारकर
तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील उमेदवारांची यादी
जळगांव-सौ.अंजली रत्नाकर बावीस्कर, रावेर-नितीन कांडेलकर, जालना-डॉ.शरदचंद्र वानखेडे, रायगड-सुमन कोळी, पुणे-अनिल जाधव, बारामती-नवनाथ पडळकर, माढा-अँड.विजय मोरे, सांगली-जयसिंग (तात्या) शेंडगे, सातारा-सहदेव ऐवळे, रत्नागिरी-सिंधूदूर्ग-मारूती रामचंद्र जोशी, कोल्हापूर-डॉ. अरूणा माळी, हातकणंगले-अस्लम बादशाहजी सय्यद
चौथा टप्प्यातील मतदारसंघातील उमेदवारांची यादी
नंदूरबार-दाजमल गजमल मोरे, दिंडोरी-बापू केळू बर्डे, नाशिक-पवन पवार, पालघर-सुरेश अर्जुन पडवी, भिवंडी-डॉ.ए.डी.सावंत, ठाणे-मल्लिकार्जुन पुजारी, मुंबई दक्षिण-डॉ. अनिल कुमार, मुंबई दक्षिण मध्य-डॉ.संजय भोसले, ईशान्य मुंबई-संभाजी शिवाजी काशीद, मावळ-राजाराम पाटील, शिर्डी-डॉ. अरूण साबळे

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची टीका, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *